मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Deepika Padukone: ‘पठाण’साठी दीपिकाही उत्सुक; पहाटेच केलं चाहत्यांचं तोंड गोड!
Pathaan
Pathaan

Deepika Padukone: ‘पठाण’साठी दीपिकाही उत्सुक; पहाटेच केलं चाहत्यांचं तोंड गोड!

25 January 2023, 8:27 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan Movie Release: चित्रपटाच्या रिलीज दिवशी दीपिका पहाटेपासून जागी असून, तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे.

Pathaan Movie Release: गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानसह, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटासाठी दीपिका देखील अतिशय उत्सुक आहे. चित्रपटाच्या रिलीज दिवशी दीपिका पहाटेपासून जागी असून, तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज (२५ जानेवारी) पहाटे ४ वाजताच्या दरम्यान दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने चाहत्यांचं तोंड गोड केले आहे. या पोस्टमध्ये एक फोटो दिसत आहे. या फोटोत एका टेबलवर एक प्लेट ठेवलेली दिसत असून, त्यात ब्राऊनी आणि आईसक्रिम दिसत आहे. तर, त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे केक, पेस्ट्री आणि आईसक्रिम दिसत आहे. सोबतच गाजर हलवा देखील दिसत आहे, या प्लेटवर ‘पठाणसाठी हार्दिक शुभेच्छा’ असे लिहिले आहे.

दीपिकाच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून, काहींनी कमेंट्समध्ये अभिनेत्रीने चाहत्यांची तोंडं गोड केल्याचं लिहिलं आहे. तर काहींनी हा चित्रपट सुपरहिट होणार असल्याचे म्हटले आहे. काहींनी कमेंट्समध्ये लिहिले की, आता या चित्रपटाची अजून प्रतीक्षा करू शकत नाही.

शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सगळे चाहते देखील आतुर झाले होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली आहे. सध्या सगळीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला करणार आहे. चित्रपटाच्या कथानकासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.