मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Beshram Rang: शाहरुखने पहिल्यांदाच दिली बेशरम रंग गाण्यावर प्रतिक्रिया, म्हणाला…

Beshram Rang: शाहरुखने पहिल्यांदाच दिली बेशरम रंग गाण्यावर प्रतिक्रिया, म्हणाला…

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2023 12:52 PM IST

Pathaan: ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करत आहे

बेशरम रंग
बेशरम रंग (HT)

'पठाण' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत आहे. या गाण्यात दीपिकाचा सिझलिंग लूक पाहण्यासारखा आहे. तसेच दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीने तर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता शाहरुखने या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यशराज फिल्मने शाहरुख खानचा पठाण चित्रपटाशी संबंधीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलाखत देत असल्याचे दिसत आहे. या मुलाखतीमध्ये त्याला चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. 'बेशरम रंग गाण्याचे स्पेनमध्ये चित्रीकरण करण्यात आले. तुझा अनुभव कसा होता' असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. त्यानंतर दीपिका विषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
वाचा: लावणी स्टार गौतमी पाटील दिसणार वेब सीरिजमध्ये

'दीपिका एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. बेशरम रंग गाण्यासाठी दीपिकासारखीच अभिनेत्री हवी होती. जी या गाण्यासाटी एकदम योग्य होती. जेव्हा तुम्ही पठाण पाहाल तेव्हा ती किती सुंदर डान्स करते हे तुम्हाला कळेल. आम्ही स्पेनमध्ये जेथे हे चित्रीकरण केले ती जागा अतिशय सुंदर होती. आम्ही सर्वांनी खूप मजामस्ती केली' असे शाहरुख म्हणाला.

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका होत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे हा वाद उद्भवला आहे. भगव्या रंगाची बिकिनी वापरल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हणत अनेकांनी या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ‘पठाण’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करत आहे.

IPL_Entry_Point

विभाग