मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sarla Ek Koti: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची 'सरला' कोण? गुपित उलगडलं

Sarla Ek Koti: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेची 'सरला' कोण? गुपित उलगडलं

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 16, 2022 12:30 PM IST

Onkar Bhojane: नुकताच सरला एक कोटी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले. त्यामध्ये कोणती अभिनेत्री 'सरला'च्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

ओंकार भोजने
ओंकार भोजने (HT)

काही दिवसांपूर्वी 'सरला एक कोटी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पण घोषणा झाल्यानंतर चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला. नावावरून हा चित्रपट काय असेल, कसा असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याचाही अंदाज बांधणे कठीण झाले होते. आता चित्रपटातील एक नवे पोस्ट प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सरला ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला ओंकार भजने 'सरला एक कोटी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता त्याच्यासोबत दिसणारी 'सरला' कोणती अभिनेत्री निभावणार हे प्रदर्शित झालेल्या पोस्टरवरुन स्पष्ट झाले.‘देवा ब्राह्मणाच्या साक्षीने साता जन्माचे वचन दिलंय’ अशी टॅगलाईन असलेलं सरलाचं पोस्टर आज सर्वांसमोर आलंय आणि ही सरला म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री ईशा केसकर आहे. कायम बबली, क्यूट गर्लवाल्या भूमिका साकारणारी ईशा या चित्रपटात ग्रामीण बाजातील लूकमध्ये दिसत आहे. गावाकडच्या स्वयंपाकघरात एका करारनाम्यावर पाठमोरी बसलेली सरला या पोस्टरमध्ये दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर काहीसे गूढ भाव आहेत. सरला कोण आहे हे कोडं उलगडलं असलं तरी चित्रपटाचा विषय अजूनही गुपितच आहे.
वाचा: अभिजीत बिचुकले कुठे आहे?; देवोलीनाने लग्न करताच चाहत्यांना झाली आठवण Video Viral

अजून एक विशेष असं की या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावाखाली ‘सत्य घटनांवरून प्रेरीत’ असं नमूद करण्यात आलंय, त्यामुळे चित्रपट नक्की कशावर बेतलेला असेल याचा अंदाज चाहते आता लावत आहेत. ओंकार आणि ईशाची ही जोडी ‘सरला एक कोटी’मध्ये काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

“सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point