मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sara Ali Khan: सारा अली खान-विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचं नाव ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

Sara Ali Khan: सारा अली खान-विकी कौशलच्या आगामी चित्रपटाचं नाव ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2023 02:01 PM IST

Sara Ali Khan and Vicky Kaushal: विकी आणि साराच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक नुकतेच समोर आले असून, त्यांच्या या चित्रपटाचे नाव 'जरा हटके जरा बचके' असे असणार आहे.

Sara Ali Khan and Vicky Kaushal
Sara Ali Khan and Vicky Kaushal

Sara Ali Khan and Vicky Kaushal: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी प्रचंड चर्चेत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही नवीन जोडी पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. बऱ्याच दिवसांपासून ही जोडी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे शीर्षक समोर आले आहे. यानिमित्ताने सारा अली खान आणि विकी कौशल ढोल वाजवण्याचा आनंद देखील घेतला आहे. या चित्रपटाबाबत सर्वच जण उत्सुक असतानाच आता या चित्रपटाचे शीर्षक समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे.

विकी आणि साराच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक नुकतेच समोर आले असून, त्यांच्या या चित्रपटाचे नाव 'जरा हटके जरा बचके' असे असणार आहे. यासोबतच चित्रपटाचे दोन पोस्टरही समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात चाहत्यांना सारा अली खान आणि विकी कौशलच्या या आगामी चित्रपटाबद्दल नवी अपडेट मिळाली होती. यामध्ये सारा अली खान आणि विकी कौशलच्या या चित्रपटाचे शीर्षक १४ मे रोजी समोर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. याच दरम्यान, सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाच्या नावाचा खुलासा झाला आहे.

Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; 'फेमस होणारच'मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचे शीर्षक आणि पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच अभिनेत्री सारा अली खान हिने या चित्रपटाचे दोन पोस्टर देखील शेअर केले आहेत. त्यांनी या पोस्टरला कॅप्शन दिले आहे की, ‘जरा हटके जरा बचके... आ रहे है हम अपनी कहानी लेकर ही आपके पास'. या चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर लोकांमध्ये त्यांच्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. आता चाहते त्यांच्या या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत.

अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशलचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट येत्या २ जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी २ जून रोजी सुपरस्टार शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट रिलीज होणार होता. मात्र, अभिनेता शाहरुख खान याच्या ‘जवान’ या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आता ७ सप्टेंबर २०२३ करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point