मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt-Arshad Warsi Movie: मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा एकत्र; पोस्टर शेअर करत म्हणाले…
Arshad Warsi-Sanjay Dutt
Arshad Warsi-Sanjay Dutt

Sanjay Dutt-Arshad Warsi Movie: मुन्नाभाई आणि सर्किट पुन्हा एकत्र; पोस्टर शेअर करत म्हणाले…

27 January 2023, 10:15 ISTHarshada Bhirvandekar

Sanjay Dutt-Arshad Warsi Movie announcement : अभिनेता संजय दत्त आणि अरशद वारसी या दोघांनीही एक पोस्टर शेअर करत चाहत्यांना नव्या चित्रपटाची हिंट दिली आहे.

Sanjay Dutt-Arshad Warsi Movie announcement :यंदा नव्या वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीज होत आहेत. तर, दुसरीकडे अनेक नव्या धमाकेदार चित्रपटांची घोषणा होत आहे. या नव्या वर्षात संजय दत्त आणि अरशद वारसी ही सुपर हिट जोडी देखील प्रेक्षकांना मोठे सरप्राईज देणार आहे. संजय दत्त आणि अरशद वारसी यांनी सोशल मीडियावर नुकतेच एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोघांना एकत्र पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता संजय दत्त आणि अरशद वारसी या दोघांनीही एक पोस्टर शेअर करत चाहत्यांना नव्या चित्रपटाची हिंट दिली आहे. या पोस्टरवर संजय दत्त आणि अरशद वारसी दोघेही कैद्याच्या वेशात तुरुंगात बंद असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. दोघांनीही पोस्टर शेअर केले असले, तरी या चित्रपटाचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. परंतु, पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहून आता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा तिसरा भाग येत असल्याचा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात संजय दत्त आणि अरशद वारसी ही जोडी झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर ‘मुन्नाभाई’चा सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. यानंतर चित्रपटाचा तिसरा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आता हे नवे पोस्टर पाहून चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संजय दत्त आणि अरशद वारसी ही जोडी पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई आणि सर्किट’ बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

संजय दत्तच्या होम प्रोडक्शन बॅनरमध्ये तयार होत असलेला हा चित्रपट २०२३मध्ये म्हणजे याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या चित्रपटाविषयीची सगळीच माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

विभाग