मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सलमान खानच्या डुप्लिकेटचा पोलिसांच्या डोक्याला ताप; भर रस्त्यात केली अटक

सलमान खानच्या डुप्लिकेटचा पोलिसांच्या डोक्याला ताप; भर रस्त्यात केली अटक

Payal Shekhar Naik HT Marathi
May 12, 2022 03:28 PM IST

सलमान येणार असेल त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. नाहीतर गोंधळाची स्थिती निर्माण होते. लखनऊमध्ये असंच काहीसं घडलंय पण ते खऱ्या सलमानला पाहण्यासाठी नाही तर खोट्या सलमानला पाहण्यासाठी.

डुप्लिकेट सलमान खान
डुप्लिकेट सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. सलमानला पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. सलमान येणार असेल त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. नाहीतर गोंधळाची स्थिती निर्माण होते. लखनऊमध्ये असंच काहीसं घडलंय पण ते खऱ्या सलमानला पाहण्यासाठी नाही तर खोट्या सलमानला पाहण्यासाठी. लखनऊमध्ये एक व्यक्ती स्वतःला सलमानचा डुप्लिकेट म्हणवून घेतो. त्याचे सोशल मीडियावर फॉलोवर्सदेखील आहेत. मात्र त्याच्या वागण्यामुळे तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली की पोलिसांना त्याला अटक करावी लागली.

ट्रेंडिंग न्यूज

डुप्लिकेट सलमान हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या फॉलोवर्सची संख्या देखील लाखोंमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी तो वारंवार रिल्स बनवत असतो. कधी तो अर्धनग्न अवस्थेत रिल्स बनवतो तर कधी सिगारेट पिताना रिल्स बनवताना दिसतो. परंतु, नुकतीच त्याच्यामुळे ठाकूरगंज येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रिल्स बनवण्यासाठी हा डुप्लिकेट सलमान ठाकूरगंज येथील घंटाघरावर चढला आणि त्याला पाहण्यासाठी तिथे बघ्यांची गर्दी जमली. ही गर्दी एवढी वाढली की तिथे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ठाकूरगंज पोलिसांनी त्याला घंटाघराहून अटक केली.

डुप्लिकेट सलमानवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर कलम १५१ अंतर्गत शांतता भंग केल्या प्रकरणी चलन काढण्यात आले. यापूर्वीही डुप्लिकेट सलमानमुळे वाहतूक कोंडी झाली होती. हा व्यक्ती भर रस्त्यात सलमानच्या गाण्यावर रिल्स बनवत असल्याने तेथे वाहनांची मोठी गर्दी झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग