मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ved Teaser: जिनिलिया - रितेशच्या वेड चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित
वेड
वेड (HT)

Ved Teaser: जिनिलिया - रितेशच्या वेड चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

24 November 2022, 14:07 ISTAarti Vilas Borade

Riteish Deshmukh Marathi Movie: हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'माऊली' या चित्रपटाच्या यशानंतर सर्वजण बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या मराठी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. त्यानंतर रितेश 'वेड' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित झाले होते. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वेड चित्रपटाच्या १ मिनिटे १८ सेकंदाच्या टीझरमध्ये एक वेगळा रितेश देशमुख प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. चित्रपटात रितेशचा प्रेम भंग झाल्याचे जाणवत आहे. तो कधी भर पावसात उभा असल्याचे जाणवत आहे तर कधी समुद्र किनारी झोपलेला दिसत आहे. एकूणच चित्रपटाचा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.
वाचा: वयाच्या ५१व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून 'वेड' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केला आहे. या चित्रपटात रितेशसोबत त्याची पत्नी, अभिनेत्री जिनिलिया डिसूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.

'वेड' या चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलियासोबत मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते अशोक सराफ दिसणार आहेत. पण त्यांची भूमिका काय असणार हे अद्याप समोर आलेले नाही. अजय-अतुल या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

विभाग