मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manoj Tiwari: वयाच्या ५१व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा
मनोज तिवारी
मनोज तिवारी (HT)

Manoj Tiwari: वयाच्या ५१व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा

23 November 2022, 10:37 ISTAarti Vilas Borade

मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

भाजप खासदार, भोजपुरी गायक आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी सध्या चर्चेत आहेत. या चर्चा मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे सुरु झाल्या आहेत. मनोज तिवारी यांनी पत्नीच्या डोहाळे जेवणाचा फोटो शेअर केला आहे. मनोज तिवारी हे वयाच्या ५१व्या वर्षी तिसऱ्यांदा पिता होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मनोज तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘काही आनंद आपण शब्दांत वर्णन करू शकत नाही, त्याला फक्त अनुभवता येतं’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा का मोडला? अनेक वर्षांनी कारण आले समोर

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात मनोज तिवारी यांची पत्नी सुरभीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर मनोज यांनी गुलाबी रंगाची शेरवानी घातली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक भोजपूरी कलाकारांनी देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुली आहेत. २०२० रोजी त्यांनी भोजपुरी गायिका सुरभीशी लग्न केले. सुरभी आणि मनोज यांना देखील एक मुलगी आहे. आता पुन्हा सुरभी गर्भवती आहे.

विभाग