मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kohinoor: आख्खं ब्रिटीश म्युझियम सक्रिय गुन्हेगारांचा अड्डा; कोहिनूर वादावर रवीनाचे ट्वीट

Kohinoor: आख्खं ब्रिटीश म्युझियम सक्रिय गुन्हेगारांचा अड्डा; कोहिनूर वादावर रवीनाचे ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 14, 2022 02:27 PM IST

Ranveena Tandon: रवीना टंडने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकन कॉमेडियन जॉन ऑलिव्हर बोलताना दिसत आहे.

रविना टंडन
रविना टंडन (HT)

काही दिवसांपूर्वी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेकांनी भावनिक पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग कोहिनूर ट्रेंड होताना दिसत होते. अनेकांनी कोहिनूर परत करण्याची मागणी केली होती. आता अभिनेत्री रवीना टंडनने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे.

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर अमेरिकन कॉमेडियन जॉन ऑलिव्हरचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोहिनूरशी संबंधीत आहे. या व्हिडीओमध्ये जॉन बोलत आहे की, “कोहिनूर हिरा त्यांना परत करावा अशी भारतीयांची मागणी होत आहे. कोहिनूर हा हिरा भारतातून आणण्यात आला होता. आता तो राणीच्या मुकुटाची शोभा वाढवत आहे.”
आणखी वाचा : पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहने उर्वशीला इन्स्टाग्रामवर केले फॉलो, पण काळी वेळातच...

पुढे तो म्हणाला, “ब्रिटनने केवळ कोहिनूर हिराच नाही तर जगभरातून अनेक ऐतिहासिक गोष्टी त्यांच्या देशात आणल्या आहेत. त्यांनी सर्व वस्तू परत करायला सुरुवात केली, तर प्रसिद्ध ब्रिटिश म्युझियम रिकामे होईल.” हे ऐकून व्हिडीओमध्ये हसण्याचा आवज येतो.

हा व्हिडीओ शेअर करत रवीनाने, “अप्रतिम पंचलाईन! संपूर्ण ब्रिटीश म्युझियम सक्रिय गुन्हेगारीचे ठिकाण म्हणून घोषित करायला हरकत नाही” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच तिने हसण्याचे इमोजी वापरले आहेत. रवीनाच्या या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.

१९५३ साली दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी कोहिनूर हा हिरा त्यांच्या मुकूटावर बसवण्यात आला होता. आता त्यांच्या निधनानंतर अनेकजण कोहिनूर परत देण्याची मागणी करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग