मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: आमच्या आई-डॅडाच्या लग्नाला यायचं हं!; ‘रंग माझा वेगळा’मध्ये रंगणार दीपा-कार्तिकचा लग्न सोहळा

Rang Maza Vegla: आमच्या आई-डॅडाच्या लग्नाला यायचं हं!; ‘रंग माझा वेगळा’मध्ये रंगणार दीपा-कार्तिकचा लग्न सोहळा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2023 01:26 PM IST

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपा आणि कार्तिकचा लग्न सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याची तयारी सध्या जोषात सुरु आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla: छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत लवकरच दीपा आणि कार्तिकचा लग्न सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याची तयारी सध्या जोषात सुरु आहे. दीपा आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. दीपा आणि कर्तिकच्या दोन्ही मुली अर्थात दीपिका आणि कार्तिकी या लग्न सोहळ्याची तयारी करत आहेत.

नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये दीपिका आणि कार्तिकी आजी सौंदर्या इनामदार हिच्यासोबत सगळ्यांना आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचं आमंत्रण देताना दिसत आहेत. ‘आमच्या आई-डॅडाच्या लग्नाला यायचं हं!’ असं म्हणत त्यांनी सगळ्या प्रेक्षकांना या लग्न सोहळ्याला बोलावलं आहे. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सौंदर्याच्या अथक प्रयत्नानंतर आता दीपा आणि कार्तिकमधले गैरसमज दूर झाले आहेत. आता दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात जाऊन त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले. मात्र, सौंदर्याने त्यांना अट घातली. सौंदर्या इनामदार म्हणाली की, ‘कार्तिक आणि दीपाने तेव्हा देखील असंच लग्न केलं. मला त्यावेळी देखील स्वतःची हौसमौज करता आली नाही. मात्र, यावेळी दोघांचं लग्न धुमधडाक्यात होणार आहे. सगळ्या विधी पूर्ण करून दीपा या घरात प्रवेश करणार आहे.’ येत्या ५ तारखेला हा लग्नसोहळा रंगणार आहे.

एकीकडे आनंदी वातवरण असताना, दुसरीकडे मात्र घरात नवं संकट देखील उभ ठाकणार आहे. इनामदारांच्या घरात आयेशा कामवाली बाई बनून येणार आहे. याआधी आयेशाने सुजयला संपवले आहे. आता ती दीपाचा जीव घेण्याच्या उद्देशाने इनामदारांच्या घरात येणार आहे. दीपा कार्तिकचा संसार मोडण्यासाठी आयेशाने नवा डाव रचला आहे. तिच्या या डावात आता सौंदर्या इनामदार अडकणार की, आयेशाची खेळी तिच्यावरच पलटवणार हे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे.

IPL_Entry_Point