मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Randhir Kapoor: करिष्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत अशी होती रणधीर कपूर यांची प्रतिक्रिया

Randhir Kapoor: करिष्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत अशी होती रणधीर कपूर यांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 15, 2023 07:54 AM IST

Randhir Kapoor Birthday: आज ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी..

रणधीर कपूर
रणधीर कपूर (HT)

बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करीना कपूर खान यांचे वडील म्हणजे रणधीर कपूर. ते सतत मुलींमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांचे मुलींसाठी घेतलेल्या निर्णयामुळे कौतुक केले जाते. खरं तर कपूर घराण्यात मुलींना अभिनय क्षेत्रात काम करण्याची परवानगी नव्हती. मात्र रणधीर कपूर यांनी दोन्ही मुलींना नेहमी पाठिंबा दिली. खास करुन करिष्माला. तिच्या वैवाहिक जीवनात वादळ सुरु असताना देखील ते लेकीच्या मागे खंभीरपणे उभे होते.

ट्रेंडिंग न्यूज

आज १५ फेब्रुवारी रोजी रणधीर कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी. रणधीर कपूर हे त्यांच्या कामापेक्षा करिष्मामुळे सतत चर्चेत असायचे. करिष्माने पहिल्या पतीला घस्फोट दिल्यावर ती उद्योगपती संदीप तोषनीवालशी दुसरे लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. रणधीर कपूरने करिष्माला तेव्हा पाठिंबा दिला होता. जेव्हा रणधीर कपूर यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, 'करिष्माला दुसरं लग्नं करायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. तिला माझा आशीर्वाद आहे. मी संदीपला ओळखत नाही. फक्त त्याचा फोटो पाहिलाय. पण करिष्मा त्याला चांगलं ओळखते. तिला संदीप योग्य वाटत असेल माझाही तिला पूर्ण पाठिंबा आहे.'
वाचा: विसकटलेले केस, धडपणारी पावलं; पार्टीनंतरच्या त्या व्हिडीओमुळे न्यासा देवगण झाली ट्रोल

करिष्माने २००३मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले होते. सुरुवातील दोघेही आनंदी होते. पण लग्नाच्या पाच-सहा वर्षांनंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला.

IPL_Entry_Point

विभाग