मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Randeep Hooda: रणदीप हुड्डाच्या "स्वातंत्र्यवीर सावरकर"चा टीझर पाहिलात का?

Randeep Hooda: रणदीप हुड्डाच्या "स्वातंत्र्यवीर सावरकर"चा टीझर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 29, 2023 03:54 PM IST

Swantantrya Veer Savarkar: रणदीप हुड्डासोबत या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील रणदीपची शरीर यष्ठी पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

Swantantrya Veer Savarkar
Swantantrya Veer Savarkar

२८ मे रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. या आनंदाच्या प्रसंगी, बहुचर्चित स्वातंत्र्य वीर सावकर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये रणदीप हुड्डाचा अभिनय पाहून तुम्हीही चकीत व्हालय

ट्रेंडिंग न्यूज

"स्वातंत्र्यवीर सावरकर" हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बयोपिक असल्याचं समजतंय. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रभावशाली व्यक्ती असणाऱ्या सावरकरांचा प्रेरणादायी प्रवास आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्न, त्यांच्या विचारधारा, बलिदान आणि राष्ट्राप्रती अतूट बांधिलकी यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.

आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित, "स्वातंत्र्य वीर सावरकर" ऐतिहासिक कथा प्रेक्षकां पर्यंत पोहोचणार आहे. सावरकरांच्या वारशाला श्रद्धांजली अर्पण करणारा आणि प्रेक्षकांना एक अस्सल आणि आकर्षक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. उत्कर्ष नैथानी सोबत रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शित आणि सह-लेखन केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटा साठी रसिकांमध्ये प्रचंड चर्चा आणि उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

"स्वातंत्र्यवीर सावरकर" या चित्रपटाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले असून संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे सूक्ष्म प्रयत्न आणि समर्पण दर्शविते. "स्वातंत्र्यवीर सावरकर" हा चित्रपट आपल्या आकर्षक कथा असलेला आणि ऐतिहासिक चित्रपट आहे. सावरकरांची विलक्षण कथा जिवंत करणे आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. "स्वातंत्र्य वीर सावरकर" या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत, उत्कृष्ट कामगिरी आणि कथाकथनाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग