मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Baloch: मराठ्यांच्या अभिमानाचा लढा दाखवणार 'बलोच', अंगावर शहारा आणणारे टीझर प्रदर्शित

Baloch: मराठ्यांच्या अभिमानाचा लढा दाखवणार 'बलोच', अंगावर शहारा आणणारे टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2023 07:55 AM IST

Baloch Teaser: मराठ्यांची विजयगाथा 'बलोच' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

बलोच
बलोच

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचे रोमांचक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टीझरमध्ये चित्रपटाची भव्यता दिसत असून अंगावर शहारे आणणारा हा टीझर आहे. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय. पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
वाचा: अतिक अहमदच्या मृत्यूनंतर स्वरा भास्करचे सरकारवर ताशेरे; ट्वीट करत म्हणाली...

विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत. यात प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या दृष्टीने मानहानी करणारा असला तरी मराठ्यांचे सळसळते रक्त त्यांना शांत बसू देत नव्हते. अन्यायाला, अत्याचाराला सामोरे जात त्यांनी शत्रुला चोख उत्तर दिले. मराठ्यांची हीच विजयगाथा मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे .''

IPL_Entry_Point

विभाग