मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pooja Bhatt: भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे मिळाले?; पूजा भट्टने दिले सडेतोड उत्तर

Pooja Bhatt: भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे मिळाले?; पूजा भट्टने दिले सडेतोड उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 23, 2022 11:16 AM IST

Bharat Jodo: अभिनेत्री पूजा भट्टने भाजप नेते नितेश राणे यांचे ट्वीट रिट्वीट केले आहे.

भारत जोडो
भारत जोडो (HT)

भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते केरळ अशी ३५०० किलोमीटरची पदयात्रा काढली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा प्रवास करत गेल्या सात नोव्हेंबरला ही यात्रा सुरु होती. भारत जोडो यात्रेनं महाराष्ट्रातील १४ दिवसांचा प्रवास पूर्ण केला. दरम्यान, या यात्रेत अनेक कलाकार देखील सहभागी झाले. यामध्ये पूजा भट्ट, अमोल पालेकर, रिया सेन, रश्मी देसाई आणि इतर काही कलाकार सहभागी झाले. आता भाजपचे अमित मालवीय यांनी दावा केला की या यात्रेत सहभागी होण्यासाठी कलाकारांना काँग्रेसकडून पैसे पुरवाण्यात आले. हे ऐकून अभिनेत्री पूजा भट्ट यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपने आरोप केला आहे की सेलिब्रिटींना बिना नावाचा एक मेसेज पाठवण्यात आला होता. या मेसेजमध्ये मध्य प्रदेशमधील कलाकारांची देखील नावे आहेत. या मेसेज मध्ये असे नमूद करण्यात आले होते की कलाकारांनी त्यांची फी सांगून ठरवलेल्या वेळेत १५ मिनिटे राहुल गांधी यांच्यासोबत वॉक करायचा आहे. त्यानंतर काँग्रेसने यावर उत्तर देत आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
वाचा: क्रूरपणाची सीमा नसते यांचे उदाहरण म्हणजे हा वाडा; 'अथांग'चा ट्रेलर चर्चेत

भाजप नेते नितेश राणे यांनी भारत जोडो यात्रेवर टीका करत ट्वीट केले आहे. 'राहुल गांधी यांची यात्रा स्टेज मॅनेज आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी आणि बोलण्यासाठी कलाकारांना पैसे दिले हा त्याचा पुरावा आहे. सब गोलमाल है भाई... ये पप्पू कभी पास नही होगा' या आशयाचे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे. त्यांचे हे ट्वीट पूजा भट्टने रिट्वीट केले आहे. रिट्वीट करत तिने हार्पर ली यांचा कोट वापरला आहे. 'त्यांनी नक्कीच असा विचार करावा. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे... पण त्यापूर्वी मी इतर कोणासोबत राहण्यापेक्षा मी तुमच्यासोबत राहू शकेन का असा विचार करेन. अनेकजण बहुमताच्या शासनाचे पालन करत नाही हे त्या व्यक्तीवर आधारित असते' या आशयाचे ट्वीट पूजा भट्टने केले आहे.

तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र असा पायी प्रवास करत आता कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर भारतातील महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. पदयात्रा दोन दिवसांची विश्रांती घेणार असल्यानं राहुल गांधी दोन दिवस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. त्यानंतर ते पुन्हा भारत जोडो यात्रेत सामील होऊन पदयात्रा सुरू करतील.

IPL_Entry_Point

विभाग