मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: 'पठाण' मोडणार 'बाहुबली २'चा रेकॉर्ड? जाणून घ्या १८व्या दिवसाची कमाई

Pathaan: 'पठाण' मोडणार 'बाहुबली २'चा रेकॉर्ड? जाणून घ्या १८व्या दिवसाची कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2023 12:55 PM IST

Shahrukh Khan: पठाण चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता बाहुबली २चा रेकॉर्ड पठाण मोडणार असे म्हटले जात आहे.

पठाण
पठाण (ANI Picture Service)

‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट जगभर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने धमाकेदार यश मिळवले आहे. दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा गाजावाजा आहे. शाहरुख खानने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागम केले आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकलेला शाहरुख प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता हा चित्रपट बाहुबली २चा कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड मोडणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'बाहुबली २.' या चित्रपटाने १००० कोटी रुपयांची कमाई जगभरात केली होती. आता पठाणने प्रदर्शनाच्या १८व्या दिवशी ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच पठाण बाहुबली २चा रेकॉर्ड मोडणार असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: स्नेहल शिदमसोबत लग्न करणार?; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने दिली प्रतिक्रिया

‘पठाण’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५१० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. शुक्रवारी चित्रपटाने ५.७५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाची कमाई मंदावली असली तरी परदेशात चांगली कमाई सुरु आहे. आता चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

IPL_Entry_Point