मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagraj Manjule: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय आहे कारण?

Nagraj Manjule: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2023 08:23 AM IST

Sayaji Shinde: नागराज यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत चंद्रपूर पोलिसांची भेट घेतली आहे. काय आहे त्यांच्या भेटीचे कारण? जाणून घेऊया...

Sayaji Shinde
Sayaji Shinde

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. नुकताच नागराज यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत चंद्रपूर पोलिसांची भेट घेतली आहे. काय आहे त्यांच्या भेटीचे कारण? जाणून घेऊया...

नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी चंद्रपूर पोलीसांची भेट घेण्यामागचे कारण आहे त्यांचा आगामी चित्रपट 'घर बंदुर बिरयाणी.' या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील अशी संपूर्ण टीम महाराष्ट्र दौरा करीत आहे. 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला.
वाचा: "काळ आला की वेळही चुकत नाही!", "सर्किट"चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित

'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे. नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

IPL_Entry_Point

विभाग