"चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. मधुर भांडारकर यांच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचे नाव 'सर्किट' असे आहे. या चित्रपट वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
"सर्किट" चित्रपटाच्या २ मिनिटे १५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वैभव तत्ववादीची अनोखी झलक पाहायला मिळते. वैभवला लगेच राग येतो आणि त्याचा स्वत:वरचा कंट्रोल सुटतो. त्यानंतर तो अनेक चुकीच्या गोष्टी करतो. या सगळ्यात हृता दुर्गुळे त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असते. कॉलेजमध्ये प्रेमात पडणारे प्रेमिक ते लग्नानंतरचे पतीपत्नी असा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे यांची उत्तम केमिस्ट्री चित्रपटात पहायला मिळणार आहे.
वाचा: दृश्यम २नंतर अजय पुन्हा करणार धमाका, अडवान्स बुकींगचा आकडा आला समोर
चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता अधिकच वाढलीय. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.