मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mrunal Thakur: 'या' दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास

Mrunal Thakur: 'या' दोन गोष्टींमुळे मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा असतो खास

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 22, 2023 11:33 AM IST

Gudi Padwa 2023: आज २२ मार्च रोजी मराठी नवीन वर्षे सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने अनेक कलाकार सर्वांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. मृणाल ठाकूरसाठी गुढीपाडवा खूप खास आहे.

मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूर (Instagram/@mrunalthakur)

हिंदू नववर्षाची सुरूवात गुढी पाडव्याने होते. आज २२ मार्च रोजी पाडवा आहे. हा सण साजरा करताना अनेकजण घरोघरी गुढी उभारतात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुढीचा अर्थ विजयाचा ध्वज आहे आणि या दिवशी ध्वज फडकवल्याने सुख-समृद्धी येते असे म्हटले जाते. अनेक मराठमोळे कलाकार या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री मृणाल ठाकूरने पाडवा तिच्यासाठी खास असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने गुढीपाडवा हा सण तिच्यासाठी दोन कारणांमुळे खास असल्याचे सांगितले आहे. 'गुढीपाडवा हा सण किंवा मराठी नवीन वर्ष हे महाराष्ट्रातील लोकांसाठी शुभ मानले जाते. कारण ते नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे आणि वसंत ऋतूचे आगमन दर्शवते. हा सण सकारात्मक उर्जा आणि आनंद देऊन जातो. तिथीनुसार, माझ्या वडिलांचा वाढदिवस हा पाडव्याच्या दिवशी असतो. त्यामुळे आमच्यासाठी पाडवा हा दुहेरी आनंद साजरा करण्याचा सण आहे' असे मृणाल ठाकूर म्हणाली.
वाचा: मुलाला धमकी मिळताच सलीम खान चिंतेत, सलमानच्या मित्राने दिली माहिती

कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटातील 'कुडिए तेरी बाइव'मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता लवकरच तिचा 'गुमराह' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग