मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lisa Marie Presley Death: मायकल जॅक्सनच्या पत्नीचं निधन; ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Lisa Marie Presley Death: मायकल जॅक्सनच्या पत्नीचं निधन; ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 13, 2023 11:00 AM IST

Lisa Marie Presley Death: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झाले आहे.

Lisa Marie Presley
Lisa Marie Presley

Lisa Marie Presley Death: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचे वयाच्या ५४व्या वर्षी निधन झाले आहे. लिसाच्या आईने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. प्रकृती खालावल्यामुळे लिसाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लिसा ही दिवंगत अमेरिकन अभिनेता, गायक आणि संगीतकार एल्विस प्रेस्ली यांची मुलगी होती. तर, पॉप सिंगर मायकल जॅक्सन यांची पूर्व पत्नी होती.

लिसाची आई प्रिसिला प्रेस्ली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे की, माझी मुलगी लिसा मेरी आम्हाला सोडून गेली. तिच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मी आतापर्यंत पाहिलेली ती सर्वात मजबूत आणि प्रेमळ स्त्री होती होती. आमच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दरम्यान आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी’, असे निवेदनात म्हटले आहे

लिसा मेरी प्रेस्ली यांना लॉस एंजेलिसमधील कॅलाबासास येथील घरी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, या उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९६८ मध्ये जन्मलेली, लिसा तिच्या वडिलांच्या मेम्फिसमधील ग्रेसलँड या आलिशान घराची मालक होती. त्यांचे हे घर एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे.

लिसा प्रेस्लेने दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सनसोबत लग्न केले होते. मात्र, नंतर दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचे लग्न १९९४ ते १९९६पर्यंत टिकले. एकदा प्रेस्लीने म्हटले होते की, मायकेल जॅक्सनशी लग्न करताना तिला मुलांना जन्म घालण्याची भीती वाटत होती. एका टॉक शो दरम्यान लिसा म्हणाली होती की, 'माझ्यावर मुलं होण्यासाठी दबाव होता आणि मलाही मूल हवे होते. पण मी भविष्याचा विचार करत होते. मला मायकल जॅक्सनसोबत कायदेशीर लढाईत कधीच उतरायचे नव्हते.’

IPL_Entry_Point

विभाग