मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mi Honar Superstar: 'ही' लाडकी अभिनेत्री करणार 'मी होणार सुपरस्टार'चे सूत्रसंचालन

Mi Honar Superstar: 'ही' लाडकी अभिनेत्री करणार 'मी होणार सुपरस्टार'चे सूत्रसंचालन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2023 09:52 AM IST

Mi Honar Superstar anchor: मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

मी होणार सुपरस्टार
मी होणार सुपरस्टार (HT)

स्टार प्रवाहवर संगीताचे नवे पर्व मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद (Mi Honar Superstar Chhote Ustaad) सुरु होत आहे. या पर्वात ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांना सहभागी होता येणार आहे. अंकुश चौधरी, कॅप्टन्स वैभव घुगे आणि फुलवा खामकर हे कलाकार परिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता या शोचे सूत्रसंचालन कोणती अभिनेत्री करणार हे समोर आले आहे.

स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून कीर्तीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनत्री समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
वाचा: मुंबईत शाहरुखच्या 'पठाण'सोबत DDLJचे स्क्रीनिंग, चाहत्यांसाठी पर्वणी

नव्या वर्षात हे नवं आव्हान स्वीकारताना समृद्धी म्हणाली, ‘मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला संभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे. माझ्या करिअरची सुरुवात अश्याच एका डान्स रिऍलिटी शो ने झाली होती. रिऍलिटी शोमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. नृत्यावरचं माझं प्रेम सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मंच खूपच खास आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

IPL_Entry_Point

विभाग