मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: मुंबईत शाहरुखच्या 'पठाण'सोबत DDLJचे स्क्रीनिंग, चाहत्यांसाठी पर्वणी

Pathaan: मुंबईत शाहरुखच्या 'पठाण'सोबत DDLJचे स्क्रीनिंग, चाहत्यांसाठी पर्वणी

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 28, 2023 11:29 AM IST

Shahrukh Khan: शाहरुख खानचा आता पर्यंतचा सर्वात रोमँटिक चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा मराठा मंदिर चित्रपटगृहामध्ये आजही पाहायला मिळतो. आता तेथे पठाण देखील लावण्यात आला आहे.

पठाण
पठाण (HT)

सध्या शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाती क्रेझ संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जणू काही धूमाकूळ घातला आहे. दोनच दिवसात चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

शाहरुख खानचा 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट मुंबईतील मराठा मंदिर येथे आजही दाखवला जातो. हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात रोमँटिक चित्रपट समजला जातो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २८ वर्षे उलटली आहेत. १९९५ साला पासून मराठा मंदिर येथे या चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरु आहे. सिंगल स्कीन चित्रपट पाहण्यासाठी आजही अनेकजण जातात. आता या चित्रपटासोबतच चाहत्यांना पठाण देखील पाहायला मिळणार आहे.
वाचा: ‘पठाण’ प्रदर्शित होताच कंगनाने व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाली...

सोशल मीडियावर थिएटरच्या बाहेरील एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाचे दोन पोस्टर दिसत आहेत. एक पोस्टर हे पठाणचे आहे तर दुसरे पोस्टर हे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटाचे आहे. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने मराठा मंदिरा थिएटरच्या बाहेरील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'या दोन फोटोंमध्ये आठवणींचा खजिना आहे. शाहरुखचा प्रवास.. जर तुम्हाला पठाणचे तिकिट नाही मिळाले तर कोणता चित्रपट पाहायचा हे तुम्हाला माहिती आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग