मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आणखी एका अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, सना खानपासून घेतली प्रेरणा
महजबी सिद्दीकी
महजबी सिद्दीकी (HT)
27 June 2022, 8:55 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 8:55 IST
  • या अभिनेत्रीने हिजाब परिधान करुन वर्कआऊट करण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉस ११ मधून बाहेर पडल्यानंतर आपल्या वेस्टर्न लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे महजबी सिद्दीकी. पण महजबीने आता ग्लॅमरची दुनिया सोडण्याचा निर्णय घेतला असून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिने आता केवळ हिजाब परिधान करण्याचे ठरवले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महजबी हिने ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला असला तरी सोशल मीडियावर हिजाब परिधान करुन वेगवेगळे फोटो पोस्ट करताना दिसत आहे. पण महजबीने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर स्वत: महजबीने एक मोठी पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : शाहरुखने 'पठाण'चे पोस्टर केले कॉपी? केआरकेचे ट्वीट चर्चेत

'मी गेल्या एक वर्षापासून सना खानला फॉलो करत आहे. मला तिचे बोलणे, वागणे प्रचंड आवडते. तिचे व्हिडीओ पाहून मी हा निर्णय घेतला आहे' असे महजबीने पोस्ट शेअर करत सांगितले होते.

पुढे ती म्हणाली, 'मी गेले २ वर्ष त्रासात होते. मला कळत नव्हते की मी असे करु ज्याने मला आनंद मिळेल. अल्लाहच्या विरोधात जाऊन माणूस कधीही आनंदी नसतात. त्यापेक्षा अल्लाहला आनंदी ठेवा. मी सनाला एक वर्षापासून फॉलो करत आहे. अल्लाच्या मार्गावर चालून मला आनंद होत आहे. माझी इच्छा आहे की अल्लाहने मला माफ करावे आणि योग्य मार्गावर घेऊन जावे.'

महजबीने स्वत:ला पूर्णपणे बदलले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये ती हिजाब घालून गाडी चालवताना दिसत आहे. तसेच वर्कआऊट करताना देखील तिने हिजाब परिधान केल्याचे दिसत आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग