मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुखने 'पठाण'चे पोस्टर केले कॉपी? केआरकेचे ट्वीट चर्चेत

शाहरुखने 'पठाण'चे पोस्टर केले कॉपी? केआरकेचे ट्वीट चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 26, 2022 04:35 PM IST

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुखचा आगामी चित्रपट पठाणचे पोस्टर आणि Beast या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे

केआरके
केआरके (HT)

बॉलिवूडचा बादशाह असणारा शाहरुख खान (shahrukh khan)याने नुकतीच इंडस्ट्रीमधील त्याची ३० वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळेच शाहरुखने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. शाहरुखने नुकतंच त्याचा आगामी चित्रपट 'पठाण' (pathaan)चे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. हे पोस्टर शाहरुखने कॉपी केल्याचा दावा अभिनेता कमाल आर खानने केला आहे.

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. आता कमाल आर खानने शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.
आणखी वाचा : अखेर सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली, पोस्टवरील कमेंट चर्चेत

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुखचा आगामी चित्रपट पठाणचे पोस्टर आणि Beast या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. शाहरुखने पठाणचे पोस्टर कॉपी केल्याचे त्याने म्हटले आहे. 'हे देवा! कॉपी करणारे कधीही सुधारणार नाहीत. पोस्टर पण कॉपी केले. पोस्टर देखील वेगळे बनवू शकत नाहीत' या आशयाचे ट्वीट केआरकेने केले आहे.

पठाणच्या पोस्टरमध्ये शाहरुख एका बाजूला तोंड करून उभा आहे. त्याच्या हातात एक मोठी बंदूक आहे आणि चेहऱ्यावर अनेक जखमा देखील आहेत. बंदूक पकडलेल्या हातात दंडाला एक तावीज बांधलेला आहे. तर त्याच हातात हातकडी देखील आहे.

WhatsApp channel

विभाग