ओम फट्ट स्वाहा! 'हा' अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ओम फट्ट स्वाहा! 'हा' अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

ओम फट्ट स्वाहा! 'हा' अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 18, 2024 08:01 AM IST

झपाटलेला ३ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ओम फट्ट स्वाहा! 'हा' अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
ओम फट्ट स्वाहा! 'हा' अभिनेता दिसणार झपाटलेला ३मध्ये, पहिल्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीमधील महेश कोठारे हे नाव प्रसिद्ध आहे. ९०च्या दशकात त्यांनी लहान मुलांची झोप उडवली होती. मराठी चित्रपटसृष्टीला असे एकाहून एक जबरदस्त, खतरनाक खलनायक दिले की त्यांची नावे घेताच लहान मुलांचा थरकाप उडत असते. त्यामधील जर प्रेक्षकांवर कुणाची सर्वात जास्त दहशत असेल तर ती म्हणजे 'तात्या विचूंची.' आता हा तात्या विंचू पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झपाटलेला ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

एसटीच्या पाठीमागे लटकून प्रवास करणारा तात्या विंचूची दहशत आजही लहान मुलामध्ये पाहायला मिळते. तो आता आपल्याच घरी येणार की काय अशी भीती त्यांना सतत वाटत असते. तिच भीती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. महेश कोठारे यांनी 'झपाटलेला ३'ची घोषणा केल्यापासून चर्चा सुरु आहेत. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

कोणता अभिनेता भूमिका साकारणार?

'झपाटलेला २' या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे हा मुख्य भूमिकेत दिसला होता. आता यावेळी देखील आदिनाथच दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. आदिनाथने चित्रपटाचे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत, "Yes it’s true !!! हो खरंय !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ चित्रपटगृहात ! 2025 in the theatres ! ओम फट स्वाहा !!!" असे कॅप्शन दिल आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत चित्रपटाची वाट पाहात असल्याचे म्हटले आहे. काही यूजर्सने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली अशी कमेंट केली आहे.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

झपाटलेला २ विषयी

महेश कोठारे यांनी जेव्हा 'झपाटलेला २' हा चित्रपट केला तेव्हा त्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. पण या भागाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिरमोड झाल्याची भावना व्यक्त केली होती. आता 'झपाटलेला ३'मध्ये आदिनाथसोबत कोणते कलाकार दिसणार? कथा नेमकी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

Whats_app_banner