मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 18, 2024 08:34 AM IST

गेल्या काही दिवसांपासून मलायका हिच्या लग्नाची सर्वजण वाट पाहात आहेत. आता अभिनेत्रीने मुलगा अरहान खानच्या पॉडकास्ट शोमध्ये दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष
तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

बॉलिवूडमधील सध्याची हॉट आणि फिट अभिनेत्री म्हणून मलायका ओळखली जाते. तिने वयाची ५०शी ओलांडली असली तरी ती सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत एखाद्या तरुण अभिनेत्रीला टक्कर देताना दिसते. आता मलायकाचा मुलगा अरहान खानने स्वत:चा पॉडकास्ट शो 'डम्ब बिरयानी' सुरु केला आहे. या शोमध्ये त्याने आई मलायकाला बोलावले आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने मलायकाला दुसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. आता मलायकाने यावर काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाली मलायका?

अरहानने मलायकाचा हात पकडला आणि प्रश्न विचारला की, 'संपूर्ण जगाला हे जाणून घ्यायचे आहे की तू लग्न कधी करणार आहेस? मला एक पक्की तारीख हवी आहे, मला सगळं जाणून घ्यायचे आहे. तू कुठे, कोणासोबत आणि कधी लग्न करणार आहेस?' या प्रश्नावर मलायकाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'मी या प्रश्नाचे उत्तर नाही देऊ शकत. माझ्याकडे कोणतचे उत्तर नाही तर मी काय बोलणार. मला असे वाटते की मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या फेजमध्ये आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगत आहे' असे मलायका म्हणाली. सध्या मलायका आणि अरहानच्या या पॉडकास्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

मलायकाची ही सवय बदलायची अरहानला

या पॉडकास्टमध्ये मलायकाने देखील अरहानला प्रश्न विचारले आहेत. तिने 'माझी अशी कोणती गोष्ट आहे जी तुला बदलायला आवडेल?' असा प्रश्न देखील विचारला. त्यावर अरहानने 'तू खूपच कष्टाळू आहेस. तू स्वत:ला देखील वेळ द्यायला हवास. थोडे थांब आणि स्वत:साठी वेळ काढ' असे उत्तर दिले.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने तोडली गिटार, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

आई-मुलाच्या गोड आठवणी

अरहान खानने या पॉडकास्टमध्ये जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. त्याने आई मलायकाला सांगितले की जेव्हा तिचा पहिला स्टँडअप कॉमेडी शो झाला त्यानंतर तिने सर्वात आधी मला फोन केला. त्यामुळे मला खूप चांगले वाटले होते. अरहान आणि मलायका यांच्यामध्ये अतिशय चांगला बाँड असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

IPL_Entry_Point