मराठी बातम्या  /  Entertainment  /  Malaika Arora Miss Behave With Fans Video Viral On Social Media

Malaika Arora: मुलीकडं दुर्लक्ष का केलं?; मलायकाचं वागणं पाहून नेटकरी संतापलं, Video Viral

मलायका अरोरा
मलायका अरोरा
Aarti Vilas Borade • HT Marathi
Mar 17, 2023 04:20 PM IST

Malaika Arora Airport Video: मलायका अरोराचा विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिचे वागणे पाहून अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

वयाची ४०शी ओलांडून अनेक तरुणींना फिटनेसच्या बाबतीत टक्कर देणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सतत तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड आणि हॉट लूकवर चाहते फिदा असतात. पण सध्या मलायकाचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने फोटो काढण्यासाठी जवळ आलेल्या चाहत्यांना दिलेली वागणून पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मलायका अरोरा नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली होती. दरम्यान तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, काळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यावर तिने काळ्या रंगाचा चष्मा लावला होता. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत होती.
वाचा: नागराज मंजुळेंची हवा! 'घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

मलायकाला एअरपोर्टवर बॉडीगार्डशिवाय चालत येत असल्याचे पाहून अनेकजण तिच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी येतात. मात्र, मलायकाने चाहत्यांना दिलेली वागणून पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी मलायकाला चांगलेच सुनावले आहे.

एका यूजरने मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करत 'तुझ्यासोबत फोटो काढण्यास आलेल्या मुलीला दुलर्क्षित का केले?' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'एका मुलीसोबत फोटो काढतानाही अॅटिट्यूड दाखवतेय' असे म्हणत संताप व्यक्त केला.

WhatsApp channel

विभाग