मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nagran Manjule: नागराज मंजुळेंची हवा! 'घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित
घर बंदुक बिरयाणी
घर बंदुक बिरयाणी

Nagran Manjule: नागराज मंजुळेंची हवा! 'घर बंदूक बिरयानी’चा ट्रेलर प्रदर्शित

16 March 2023, 12:20 ISTAarti Vilas Borade

Ghar Banduk Biryani Trailer: 'घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या ३ मिनिटे ८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे भलताच भाव खाऊन गेले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नागराज मंजुळे ओळखले जातात. त्यांचा घर बंदुक बिरयानी या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात थोडी हटके कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पहायाला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या ३ मिनिटे ८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नागराज मंजुळे भलताच भाव खाऊन गेले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे.
वाचा: 'घर बंदूक बिरयानी’तील मोस्ट वॉन्टेड गुंड गँग आली समोर

या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसत आहेत तर सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसत आहे. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांना भावणारी आहे. ट्रेलरमधील लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे पार्श्वसंगीत आणि अभूतपूर्व ॲक्शन. ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत आहे. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. ही गाणी भन्नाट लोकप्रिय होतात. या चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे.लाखोंच्या वर व्ह्यूज मिळालेल्या या गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यास यश मिळाले आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.

नागराज मंजुळेने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' प्रदर्शित होणार आहे. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.