'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे', मकरंद अनासपुरे यांनी मांडले स्पष्टच मत-makarand anaspure talked about political situation in maharashtra ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे', मकरंद अनासपुरे यांनी मांडले स्पष्टच मत

'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे', मकरंद अनासपुरे यांनी मांडले स्पष्टच मत

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 18, 2024 08:54 AM IST

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकारणावर मत मांडले आहे. त्यावेळी त्यांनी 'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे' असे म्हटले आहे.

'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे', मकरंद अनासपुरे यांनी मांडले स्पष्टच मत
'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे', मकरंद अनासपुरे यांनी मांडले स्पष्टच मत

सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरु झाले आहे. तर, दुसरीकडे प्रचाराचा देखील धुरळा उडताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले आहेत. पण बंडखोरी करणाऱ्या पक्षाकडे चिन्ह आणि नाव गेल्याचे दिसत आहे. आता मराठमोळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सध्या देशात आणि राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर स्पष्टच मत मांडले आहे. त्यांनी 'आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे' असे म्हटले आहे.

अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा 'राजकारण गेलं मिशीत'हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे ते सध्या प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना सध्याच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्वत:चे परखड मत मांडले आहे.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

सध्या सुरू असलेला प्रकार हा आम्हा मतदारांची फसवणूक असल्यासारखे वाटते. मतदान करताना तो उमेदवार, व्यक्ती पाहून मत दिले जात असते. आता, ज्याच्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे त्या माणसाने कोलांटउडी मारल्यानंतर फसवणूक झाल्यासाऱखी वाटते. महाराष्ट्राचे भवितव्य हे तरुणाईच्या हाती आहे असे मकदंर अनासपुरे म्हणाले.
वाचा: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

पवार की ठाकरे घराणे?

पवार की ठाकरे यापैकी कोणते घराणे आवडीचे आहे, असा प्रश्न मकरंद यांना विचारण्यात आला. त्यावर यांनी, पवार आणि ठाकरे या दोन्ही घराण्यांना इतकी वर्ष पाहत आलो आहे. आता दोन्ही घराणे एकत्र आले आहे. त्यामुळे आता या दोन्ही घराण्यांना वेगळे करता येणार नाही असे उत्तर दिले आहे.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट

काय आहे चित्रपटाची कथा?

'राजकारण गेलं मिशीत' हा चित्रपट राजकारणावर व्यंगात्मक भाष्य करणारा आहे. ज्या व्यक्तीची राजकारणात जाण्याची जराही इच्छा नसते, ती व्यक्ती राजकारणात गेल्यावर नेमके काय होते? याचे गमतीशीर आणि परखड भाष्य चित्रपटात करण्यात आले आहे. आता या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे.

Whats_app_banner
विभाग