Gufi Paintal In Hospital: बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'महाभारत'मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुफी पेंटल यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेते गुफी पेंटल यांनी ‘शकुनी’च्या पात्रात आपल्या दमदार अभिनयाने अक्षरशः प्राण फुंकले होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. परंतु, आजही लोक त्यांना शकुनी मामाच्या नावाने ओळखतात.
अभिनेता गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याच्या बातम्या येत आहेत. काल त्यांनी प्रकृती खालावली होती. पण, आता तब्येतीत थोडी सुधारणा झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अभिनेत्री टीना घई हिने गुफी पेंटल यांच्या प्रकृतीबाबत एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करताना टीनाने लोकांना अभिनेत्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.
‘महाभारता’त संस्मरणीय भूमिका साकारणारे गुफी पेंटल आता ७८ वर्षांचे आहेत. त्यांना अभिनयाचे इतके वेद लागले होते की, मधेच इंजिनीअरिंग सोडून त्यांनी मुंबईत येऊन अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. नंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले. गुफी पेंटल यांनी 'महाभारत', 'अकबर बिरबल', 'सीआयडी' आणि 'राधा कृष्णा' सारख्या टीव्ही मालिका केल्या. परंतु, आजही लोक त्यांना बीआर चोप्राच्या 'महाभारत'मधील शकुनी मामाच्या रूपात सर्वात जास्त ओळखतात. 'महाभारत'मध्ये शकुनी मामाची भूमिका साकारून ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
टेलिव्हिजन सीरियल्सशिवाय गुफी पेंटल यांनी 'दावा', 'सुहाग', 'देश परदेस' आणि 'घूम' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ते अनेकदा पडद्यावर वडिलांची भूमिका साकारताना दिसला आहे. गुफी पेंटल अभिनेता असण्यासोबतच निर्माता देखील आहेत.
संबंधित बातम्या