मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahabharat: 'महाभारत' मालिकेत नंदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन

Mahabharat: 'महाभारत' मालिकेत नंदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 30, 2022 09:05 AM IST

Rasik Dave death: अभिनेते रसिक दवे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रसिक दवे
रसिक दवे (HT)

'महाभारत' या मालिकेमध्ये नंदाची भूमिका साकारणारे अभिनेते रसिक दवे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून रसिक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान किडनी खराब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रसिक यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्रई केतकी दवे, मुलगी रिद्धी आणि मुलगा अभिषेक आहे.

रसिक यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच हिंदी आणि गुजराती नाटकांमध्येही ते दिसले होते. संस्कार धरोहर अपनों की, सीआयडी, कृष्णा या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. पण 'महाभार' या मालिकेतील नंद या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. निर्माते जेडी मजीठिया यांनी रसिक यांच्या निधनाची माहिती दिली आहे. रसिक आणि जेडी यांनी काही नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे.

रसिक हे गेल्या दोन वर्षांपासून डायलिसीसवर होते. त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. आठवड्यातून तीन वेळा त्यांना डायलिसीससाठी रुग्णालयात जावे लागत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काल, २९ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

IPL_Entry_Point

विभाग