आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. मग त्या कलाकाराचा आगामी चित्रपट असो किंवा त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी असो. चाहत्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे असते. तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानचं शिक्षण माहिती आहे का? चला जाणून घेऊया...
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. मालिकांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. तिला खरी ओळख मिळाली ती होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
वाचा: ठरलं! तेजश्री प्रधान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार 'या' चित्रपटात
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तेजश्री बँकेत काम करत होती. प्रचंड मेहनत घेत आणि कष्ट करत तेजश्रीने तिचे शिक्षण पूर्ण केले. चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर, डोंबिवली येथून तेजश्रीचं शालेय शिक्षण झालंय. तेजश्रीला आधीपासून अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिने NIITचा एक कोर्स केला होता. तिला कॉऊन्सीलर व्हायचं होतं. तिला सायकोलॉजीमध्ये इंट्रेस्ट होता. त्यामुळे तेजश्रीनं इयत्ता चौदावीपर्यंत सायकोलॉजी हा विषय घेऊन शिक्षिण घेतले.
चौदावीला असतानाच तेजश्रीला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. शुटिंगमुळे तिला सायकोलॉजीचे प्रॅक्टीकल अटेंड करणे शक्य होत नव्हते. नंतर तिने पॉलिटिकल सायन्समधून ग्रँज्युएशन पूर्ण केले.
कामाविषयी बोलायचे झाले तर तेजश्रीचा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आनंद गोखले दिग्दर्शित हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेजश्री आणि सुबोधला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण आता उत्सुक आहेत.