मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Leopard on Set: लोकप्रिय मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या, टीमची उडाली तारांबळ!

Leopard on Set: लोकप्रिय मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या, टीमची उडाली तारांबळ!

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 05, 2023 04:21 PM IST

Saubhagyavati Bhava: मालिकेच्या सेटवर बिबट्याला पाहाताच शुटिंग थांबवण्यात आले.

Saubhagyavati Bhava
Saubhagyavati Bhava

अभिनेता करणवीर बोहरा आणि अभिनेत्री स्मृती झा मुख्य भूमिकेत असणाऱ्या 'सौभाग्यवती भव:' मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे मुंबईतील फिल्मसिटीमध्ये शुटिंग सुरु आहे. शुटिंग सुरु असताना सेटवर बिबट्या शिरला. त्यानंतर सेटवर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 'सौभाग्यवती भव:' मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी अचानक बिबट्या तेथे पोहोचला. त्यावेळी सेटवर काही क्रू मेंबर्स आणि कलाकार उपस्थित होते. सेटवरील सर्वजण सुखरुप आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखे काही नाही. मात्र, सतत बिबट्यांचे सेटवर येणे सर्वांसाठी भीतीदायक आहे.
वाचा: शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अनोखा उपक्रम, केला अमेरिका दौरा

यापूर्वी अभिनेता शोएब इब्राहिम महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या 'अजूनी' मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला होता. त्यानंतर जवळपास चार ते पाच दिवस मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यावेळी त्या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर 'गुम है किसी के प्यार में', 'नागिन 6' आणि मराठी मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असते' मालिकांच्या सेटवर देखील बिबट्या अढळला होता.

मालिकांच्या सेटवर सतत बिबट्यांचा वावर असल्यामुळे कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी शुटींग फिल्मसिटीमध्ये करणे सुरक्षीत नसल्याची भावना व्यक्त केली आहे.या घटनांनंतर अनेक कलाकारांनी सरकारकडे यावर काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी देखील केली आहे.

'सौभाग्यवती भव:' मालिकेच्या सेटवर बिबट्याने शिरकाव केल्यामुळे शुटिंग तातडीने थांबवण्यात आले. या मालिकेत अभिनेता धीरज धूप महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. यापूर्वी अभिनेता करणवीर बोहरा दिसला होता. आताच्या सिझनमध्ये त्याला रिप्लेस करण्यात आले आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग