मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  kajol: काजोलची पहिली वेबसीरिज येतेय! नावावरून अंदाज येईना; टीझरनं आणखी गोंधळ वाढवला, पाहाच!

kajol: काजोलची पहिली वेबसीरिज येतेय! नावावरून अंदाज येईना; टीझरनं आणखी गोंधळ वाढवला, पाहाच!

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 12, 2022 11:24 AM IST

अभिनेत्री काजोल ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आता ती एका सीरिजमध्ये दिसणार आहे.

काजोल
काजोल (HT)

एकेकाळी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे दिसत आहे. तिचा 'त्रिभंग' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता त्यानंतर काजोल एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काजोलच्या सीरिजचे नाव ‘द गुड वाईफ : प्यार, कानून, धोका’ असे आहे. या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये काजोल ही एका वकीलाच्या गणवेशात दिसत आहे. ती या गणवेशात ऑफिसला जाताना दिसत आहे. एकंदरीत काजोल सीरिजमध्ये एका वकीलाची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा टीझर शेअर करत तिने, 'सुरुवात करुया?' असे कॅप्शन दिले आहे.

काजोल मुख्य भूमिकेत असणारी ही सीरिज अमेरिकन कार्यक्रम 'द गुड वाईफ'चा हिंदी रिमेक आहे. हा कार्यक्रम २००९ ते २०१६ या कालावधीमध्ये प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये अभिनेत्री जुलियाना मार्गुलीज मुख्य भूमिकेत दिसली होती. आता याच्या हिंदी रिमेकमध्ये काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज 'डिस्ने प्लस हॉटस्टार' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा करणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग