मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kajol : इतकी गोरी कशी झालीस?; रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलने दिलं धडधडीत उत्तर!

Kajol : इतकी गोरी कशी झालीस?; रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना काजोलने दिलं धडधडीत उत्तर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 10, 2023 08:44 AM IST

Kajol’s Hilarious Replay To Trollers : सोशल मीडियावर एक मजेदार फोटो शेअर करून काजोलने ‘गोरी कशी झालीस?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे.

Kajol
Kajol

Kajol’s Hilarious Replay To Trollers : बॉलिवूडची बबली अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. वयाच्या ४८व्या वर्षात देखील काजोलचं सौंदर्य अनेकांना भुरळ घालत आहे. बॉलिवूडची डस्की ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजोलच्या रंगावरून तिला अनेकदा ट्रोल करण्याचा प्रयत्नही झाला आहे. काजोलच्या रंगाबद्दल तिला अनेकदा प्रश्न विचारले जातात. गेल्या काही दिवसांपासून काजोलला तिच्या त्वचेच्या रंगावरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सोशल मीडियावर एक मजेदार फोटो शेअर करून काजोलने ‘गोरी कशी झालीस?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे.

काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काजोलने संपूर्ण चेहरा काळ्या रंगाच्या मास्कने झाकलेला दिसत आहे. तर, डोळ्यांवर देखील सनग्लासेस लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये काजोलचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. स्वतःचा हाच फोटो शेअर करत काजोलने तिच्या त्वचेच्या रंगाचा खुलासा केला आहे.

Kajol's post
Kajol's post

आपला हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जे मला सतत विचारत राहतात की, मी इतकी गोरी कशी झाली? त्यांच्यासाठी...’ यासोबत हॅशटॅग वापरून तिने त्वचेचं सूर्यप्रकाशापासून कशाप्रकारे बचाव करते, ते सांगितले आहे. काजोलने हे गंमतीने लिहिले असले तरी, ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरही दिले आहे. काजोलला अनेकवेळा विचारण्यात आले आहे की, पूर्वी ती सावळी दिसायची, मग आता तिची त्वचा इतकी उजळ कशी झाली?

बर्‍याच वेळा काजलला त्वचेची शस्त्रक्रिया किंवा स्कीन लाइटनिंग करून घेण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता. तर, काही जणांनी तिला तू सर्जरी केलीस, म्हणत ट्रोल देखील केले होते. यावर उत्तर देताना काजोल एका मुलाखतीत म्हणाली होती की, गेली अनेक वर्षे ती उन्हात काम करत होती, त्यामुळे तिच्या त्वचेवर देखील परिणाम झाला होता. मात्र, आता ती त्वचेची काळजी घ्यायला शिकली आहे.

IPL_Entry_Point

विभाग