मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manu James Death: पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्याचे निधन

Manu James Death: पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्याचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 27, 2023 09:15 AM IST

वयाच्या ३१व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

जोसेफ
जोसेफ (HT)

केरळमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता जोसेफ मनु जेस्मचे निधन झाले आहे. वयाच्या ३१व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जोसेफचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जोसेफची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्याला एर्नाकुलममधील अलुवा येथील राजगिरी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याला न्यूमोनिया झाल्याचे समोर आले. पण जोसेफची प्रकृती इतकी बिघडली की त्याचे निधन झाले.

जोसेफचा पहिला चित्रपट 'नैन्सी रानी' लवकरच प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जोसेफचे निधन झाले आहे. या चित्रपटात अर्जुन अशोका आणि अहना कृष्ण हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी चित्रपटाचा निर्माता जोसेफचे निधन झाले आहे. त्याचा हा पहिलावहिला चित्रपट होता.

जोसेफ हा केवळ चित्रपट निर्माता नव्हता. त्याने २००४ साली कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. Am Curious या चित्रपटाने त्याने करिअरसला सुरुवात केली होती. आता निर्माता म्हणून तो एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करत होता. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग