मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranveer Deepika : रणवीरनं दीपिकाला बर्थ-डे विश का केलं नाही?

Ranveer Deepika : रणवीरनं दीपिकाला बर्थ-डे विश का केलं नाही?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 06, 2023 06:17 PM IST

Ranveer Singh: गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणचं काही तरी बिनसलं असल्याचे म्हटले जात आहे.

दीप-वीर
दीप-वीर (AFP)

जवळपास एक दशक एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांनी लग्न केले. ते बऱ्याच वेळा अनेक इवेंटला एकत्र असतात. रणवीर दीपिकाची सतत काळजी घेत असतो. पण आता दीपिकाच्या वाढदिवशी रणवीरने पोस्ट का केली नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकामध्ये बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रणवीर आणि दीपिकाने कधीही ते मान्य केले नाही. ते अनेकदा कॅमेरामध्ये एकत्र कैद झाले होते. कधी एकमेकांचा हात पकडून फोटोला पोझ दिली तर कधी सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर कमेंट केल्या. मात्र दीपिकाच्या वाढदिवशी रणवीरने कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात बिनसलं तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला होता.
वाचा: दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही किस करत राहिले अन्…; जाणून घ्या दीप-वीरची लव्हस्टोरी

काल, ५ जानेवारी दीपिकाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण रणवीरने दीपिकासाठी पोस्ट लिहिली नाही. इतकं सगळं चांगलं सुरु असताना रणवीरने दीपिकासाठी पोस्ट का केली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. यावरुन ते दोघे दिखाव्यासाठी एकत्र असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ते दोघे घटस्फोट घेत असल्याचे म्हटले जात आहे.

IPL_Entry_Point