मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील ‘ही’ अभिनेत्री घेणार एक्झिट? चर्चांना उधाण

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील ‘ही’ अभिनेत्री घेणार एक्झिट? चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 28, 2023 01:39 PM IST

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सर्वांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता कोणती अभिनेत्री मालिका सोडणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आई कुठे काय करते
आई कुठे काय करते (HT)

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेक्षकांनी अक्षरश: मालिका डोक्यावर उचलून घेतली आहे. आता या मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश त्याच्या वागण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. तो लवकरच गौरीसोबत लग्न करणार होता. गौरी आणि यश ही सर्वांची आवडती जोडी आहे. मात्र अचानक गौरीने यशच्या आयुष्यातून एक्झिट घेतली आणि ती तिच्या आई-वडिलांकडे अमेरिकेला निधून गेली. आता गौरीने मालिकेतून कायमची एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे.
वाचा: 

गौरीने आई कुठे काय करते ही मालिका सोडली आहे. ती लवकरच सन टीव्हीवरील एका मालिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. या मालिकेचे नाव 'प्रेमास रंग यावे' असे आहे. मात्र गौरीने मालिका कायमची सोडली की ती पुन्हा मालिकेत दिसणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच गौरी कुलकर्णीला नव्या मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग