मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Kundra: पॉर्न प्रकरणी राज कुद्रांचा गंभीर आरोप, म्हणाला, मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी...

Raj Kundra: पॉर्न प्रकरणी राज कुद्रांचा गंभीर आरोप, म्हणाला, मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी...

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 30, 2022 11:32 AM IST

Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राने सीबीआयकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.

राज कुंद्रा
राज कुंद्रा (HT)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चर्चेत आहे. या चर्चा पॉर्नोग्राफी प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता राजने केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्याने मुंबई क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पोर्नोग्राफी प्रकरणात "मुंबई क्राईम ब्रान्चमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात गोवलं होतं," असा दावा राज कुंद्राने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच एका व्यावसायिकाने सूड उगवण्यासाठी मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांसोबत पॉर्नोग्राफी रॅकेटच्या खोट्या प्रकरणात अडकवल्याचे सांगितले आहे.
वाचा: नोराला लावणी करायला लावलीच; ‘वाजले की बारा’ गाण्यावर अमृताने दिली साथ

'माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा सीबीआयने पुन्हा तपास करावा अशी मी विनंती करतो. जेणेकरुन मला न्या मिळेल' अशी मागणी राजने केली आहे. राजने केलेल्या तक्रारीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पत्र लिहिले आहे.

राजने आजवर त्याच्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 'मी कोणत्याही पॉर्नोग्राफी व्हिडीओची निर्मिती केलेली नाही. तसेच यामधून कोणतेही पैसे कामावलेले नाहीत. हॉटशॉट अॅप हे माझ्या मेहूण्याचे आहे. ते अॅप अश्लील नव्हते' असे राजने सांगितले होते.

IPL_Entry_Point

विभाग