मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?', हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
हेमांगी कवी
हेमांगी कवी (HT)
24 June 2022, 9:14 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 9:14 IST
  • हेमांगीने महाराष्ट्रातील राजकारणात सुरु असलेल्या गोंधळावर ही पोस्ट केल्याचे म्हटले जात आहे. पण काय आहे पोस्ट मागचे सत्य जाणून घ्या

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) जवळपास ३५ ते ४० शिवसेनाआमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारही (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आले आहे. आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये तिने ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ असे म्हटले आहे. हेमांगीची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : 'निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा', राजकीय गोंधळावर स्वराचे ट्वीट

हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “माणसाला जनावर म्हणलं तर राग येतो आणि वाघ म्हणलं की भारी वाटतं.पण त्यांना कोण सांगणार वाघ सुद्धा जनावरच आहे” असे म्हटले आहे.

हेमांगीने या पोस्टनंतर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटातील एक गाणे शेअर केले आहे. हे गाणे शेअर करत तिने, 'हाच खरा वाघ आहे' असे म्हटले आहे. त्यामुळे हेमांगीची आधीची पोस्ट ही तिच्या आगामी चित्रपटाशी संबंधीत असल्याचे म्हटले जात आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग