मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा', राजकीय गोंधळावर स्वराचे ट्वीट
स्वरा भास्कर
स्वरा भास्कर (HT)
23 June 2022, 8:01 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 8:01 AM IST
  • अभिनेत्री स्वरा भास्करने महाराष्ट्रातील राजकीय गोंधळावर ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर टांगती तलवार आहे. शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहाटीला पोहोचल्याने सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आणखी बळावली आहे. महाराष्ट्रातील राजकारणातील उलथापालथ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत चर्चेत असते. कधी चित्रपटांमधील तिच्या भूमिकांमुळे तर कधी सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेचा विषय ठरते. नुकताच स्वराने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : घटस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवने सोडले मौन, म्हणाला...

काय आहे स्वराचे ट्वीट?

'काय मूर्खपणा सुरु आहे! आपण मतदान करतोच कशाला… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा…’ या आशयाचे ट्वीट तिने केले आहे. त्यासोबतच तिने हॅशटॅगचा वापर करत #MaharashtraPoliticalTurmoil असे म्हटले आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आता सरकार वाचवण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, ती रद्द करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग