मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vicky Kaushal Birthday: मुंबईतील चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूडवर राज्य! वाचा अभिनेत्याबद्दल...

Vicky Kaushal Birthday: मुंबईतील चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूडवर राज्य! वाचा अभिनेत्याबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 16, 2023 07:41 AM IST

Happy Birthday Vicky Kaushal: विकीचा जन्म मुंबईतील एका छोट्याशा चाळीत झाला होता. त्याच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट सारखीच आहे.

Vicky Kaushal
Vicky Kaushal

Happy Birthday Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल हा आजघडीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच करोडो लोकांची मने जिंकली आहेत. विकी आज (१६ मे) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज जरी विकीने कोट्यावधींची संपत्ती कमावली असली, तरी त्याचा जन्म मुंबईतील एका छोट्याशा चाळीत झाला होता. त्याच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट सारखीच आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ट्रेंडिंग न्यूज

विकी कौशलचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर्सपैकी एक आहेत. पण, शोबिझच्या या जगात यश मिळवण्याआधी कौशल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो खूप कठीण काळाला सामोरा गेला आहे. विकी कौशलने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल बोलताना सांगितले होते की, चाळीत जन्म घेतल्यानंतर त्याला खूप काही सहन करावे लागले होते. त्यांना शेजारच्या लोकांसोबत बाथरूम शेअर करावे लागले. त्याचे संपूर्ण बालपण मुंबईतील एका चाळीत गेले होते.

Rang Maza Vegla: कार्तिक दीपाची माफी मागणार! पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होणार का?

स्टंट दिग्दर्शक म्हणून यश मिळवण्याआधी विकीच्या वडिलांनी अनेक वर्षे आर्थिक अडचणींचा सामना केला. अभिनय क्षेत्र निवडण्याविषयी बोलताना विकी कौशल म्हणलेला की, जेव्हा त्याने त्याच्या आई-वडिलांना अभिनयाची आवड सांगितली, तेव्हा आश्चर्यचकित झाले. परंतु, त्याच्या वडिलांनी लगेचच त्याला अभिनेता बनण्याची परवानगी दिली. पण काम मिळवण्यासाठी कधीही माझ्या नावाचा वापर करायचा नाही, अशी तंबीही वडिलांनी दिली होती.

विकी कौशलने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा विकी त्याच्या करिअरसाठी पर्याय शोधत होता, तेव्हा त्याला पदवी शिक्षणानंतर दूरसंचार अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. पण, त्याला अभिनयात रस होता. मात्र, अभिनेता होण्यासाठीही त्याला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. विकी कौशलने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘संजू’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या संजय दत्तच्या मित्राची अर्थात ‘कमली’ची भूमिकाही चांगलीच गाजली. यानंतर विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट देखील खूप गाजला.

IPL_Entry_Point

विभाग