मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghar Banduk Biryani: आकाश ठोसर V/s सयाजी शिंदे; ‘आहा हेरो’ नवे गाणे एकदा पाहाच

Ghar Banduk Biryani: आकाश ठोसर V/s सयाजी शिंदे; ‘आहा हेरो’ नवे गाणे एकदा पाहाच

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 02, 2023 11:18 AM IST

Ghar Banduk Biryani Song: 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातील ‘आहा हेरो’ हे गाणे नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आकाश ठोसर आणि सयाजी शिंदे यांचा लूक, टशन पाहण्यासारखी आहे.

घर बंदुक बिरयाणी
घर बंदुक बिरयाणी (HT)

बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गुन गुन' हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. ‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं झळकले आहे. ‘आहा हेरो’ असे नव्या गाण्याचे नाव आहे.
वाचा: समांथाच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करतेय अदिती राव हैदरी, व्हिडीओ चर्चेत

'आहा हेरो' या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून 'घर बंदूक बिरयानी' हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. ‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

गाण्याविषयी नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ''आहा हेरो हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. त्यामुळे ही गाणी संगीतप्रेमींना नक्कीच आवडणार, हा विश्वास मला पहिल्या दिवसापासून आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ए. व्ही प्रफुल्लचंद्र म्युझिकल, असे का लिहिले आहे, हे प्रेक्षकांना ७ एप्रिलनंतर कळणार आहे.’’

IPL_Entry_Point

विभाग