मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dilip Joshi: जेठालाल पोहोचला 'शार्क टँक इंडिया२'मध्ये, गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या पिचवर मिळाले असे उत्तर

Dilip Joshi: जेठालाल पोहोचला 'शार्क टँक इंडिया२'मध्ये, गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या पिचवर मिळाले असे उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 19, 2023 03:52 PM IST

Jethalal in Shark Tank India 2: सध्या सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो शार्क टँक इंडिया २मध्ये जाऊन गडा इलेक्ट्रॉनिक्ससाठी पिच करताना दिसत आहे.

जेठालाल
जेठालाल (HT)

शार्क टँक इंडिया या शो चा पहिला सीजन हिट ठरल्यावर दुसरा सीजन नुकताच सुरू झाला आहे. अनेक हटके बिझनेस घेऊन नवउद्योजक या शोमध्ये भांडवल उपलब्ध व्हावे घेण्यासाठी येतात. पहिला सीजन जसा गाजला तसाच हा दुसरा सीजनही गाजत आहे. अशातच या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी त्याच्या गडा इलेक्ट्रॉनिक्ससाठी पिच करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जेठालालचा शार्क टँक इंडिया सीझन २मधील हा खरा व्हिडीओनसून एक मीम आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला शोमध्ये जेठालालचे स्वागत केले जाते. त्यानंतर शोमधील परिक्षक अमन जेठालालला व्यवसायाविषयी विचारतो. जेठालाल त्याचे गडा इलेक्ट्रॉनिक्स आणि टर्नओवरविषयी सांगतो. त्यानंतर परिक्षकांच्या मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर जेठालालचा हा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: उर्फीला पाठिंबा देणाऱ्यांनी तिला कपडेही द्यावेत; चित्रा वाघ संतापल्या

अनेक यूजर्सने जेठालालच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याला देखील परिक्षक म्हणून घ्या असा सल्ला दिला आहे. एका यूजरने गडा इलेक्ट्रोनिक्सची कमाई इतर शार्क पेक्षा जास्त आणि यांनी जेठालालचा खर्च झेपणार नाही असे म्हटले आहे. शार्क टँक इंडिया २ या शोविषयी बोलायचे झाले तर सध्या अनुपम आणि अमन या दोन परिक्षकांमध्ये पुण्यातील एका साबण्याच्या ब्रँडवरुन वाद झाला होता. त्यामुळे शो चर्चेत होता. आता जेठालालचा व्हिडीओ पाहून सर्वांना हसू अनावर झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग