मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Death Anniversary: 'आतून मी खूप भावूक...', इरफान खानचं शेवटचं ट्वीट

Death Anniversary: 'आतून मी खूप भावूक...', इरफान खानचं शेवटचं ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 29, 2022 10:02 AM IST

इरफान खानची आज, २९ एप्रिल रोजी दुसरी पुण्यतिथी

इरफान खान
इरफान खान (HT)

आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याने बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले होते. आज २९ एप्रिल रोजी इरफानची पुण्यतिथी. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. आजही अनेकजण इरफानच्या आठवणीत भावूक झाल्याचे दिसते.

ट्रेंडिंग न्यूज

इरफानने त्याच्या निधनाच्या काही दिवस आधी एक ट्वीट केले होते. १२ एप्रिल रोजी केलेले हे ट्वीट त्याचे अखेरचे ट्वीट ठरले आहे. या ट्वीटमध्ये त्याने त्याचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’चे पोस्टर शेअर केले होते. त्यासोबतच चित्रपटातील एक संवाद देखील शेअर केला होता.

इरफानने शेअर केलेल्या फोटोवर "मिस्टर चंपकची मन:स्थिती अशी आहे" असे लिहिले होते. त्यासोबतच हा फोटो शेअर करत त्याने “आतून मी खूप भावूक आहे पण बाहेरून मी खूप आनंदी आहे” असे म्हटले होते. त्याच्या या ट्वीटमधून शेवटच्या दिवसांमध्ये इरफान खान कठीण काळातून जात असल्याचे जाणवले होते.

इरफान खानला मार्च २०१८मध्ये कॅन्सर झाल्याचे कळाले होते. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. दरम्यान, त्याने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. पण २०१९मध्ये त्याने अंग्रेजी मीडियम या चित्रपटाचे राहिलेले चित्रीकरण पूर्ण केले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा संपूर्ण देशात करोना व्हायरसचे सावट होते. त्यामुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.

IPL_Entry_Point