मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rishab Shetty: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला पुरस्कार

Rishab Shetty: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला पुरस्कार

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 16, 2023 08:34 AM IST

Dadasaheb Phalke International Film Festival: हा पुरस्कार सोहळा २० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ऋषभ शेट्टी
ऋषभ शेट्टी (HT)

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळतो. जवळपास सगळेच दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट होताना दिसत आहेत. अशातच कांतारा या चित्रपटाने तर प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला होते. ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्रद्वारे ऋषभ शेट्टीला जाहिर झालेल्या पुरस्काराविषयी माहिती दिली आहे. हा पुरस्कार सोहळा २० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वाचा: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये केलं किस, कोण आहे भूमी पडणेकरचा बॉयफ्रेंड?

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपटसृष्टीमधील कामगिरीबद्दल सन्मानित केले जाते. २०१९ मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केजीएफ फेम अभिनेता यशला सन्मानित करण्यात आले होते. २०२० मध्ये अभिनेता किच्चा सुदिपला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आता ऋषभ शेट्टीला मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नुकतंच रिषभने ‘कांतारा’च्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. ‘कांतारा’ हा फक्त १६ कोटीच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे, पण याला मिळालेलं यश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता याच्या प्रीक्वलसाठी जास्त बजेटसह हा चित्रपत आणखी भव्य पद्धतीने सादर करणार असल्याची चर्चा होत आहे.

IPL_Entry_Point

विभाग