मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  यापेक्षा मोठे दु:ख नाही; अक्षय कुमारने वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली

यापेक्षा मोठे दु:ख नाही; अक्षय कुमारने वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला श्रद्धांजली

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 30, 2022 10:55 AM IST

Heeraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांनी आज पहाटे वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार (HT)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांनी आज, ३० डिसेंबर रोजी पहाटे निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट केले आहे. त्यामध्ये 'आई गमावण्यापेक्षा मोठे दु:ख नाही. देव तुम्हाला या कठीण काळाशी लढण्यासाठी शक्ती देवो' अक्षयने असे म्हटले आहे.
वाचा: अडल्ट स्टार केंद्रा लस्टचा ‘पठाण’मधील गाण्यावार खतरनाक डान्स, Video Viral

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'या कठीण काळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देवो' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

कंगना रणौत पोस्ट
कंगना रणौत पोस्ट (HT)

समोर आलेल्या माहितीनुसार, काल मोदी हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. दुपारी ३.३० वाजता त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. तब्बल दीड तास मोदी हे त्यांच्या आईसोबत होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार जुगलजी ठाकूर यांनी हिराबेन यांना दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि आरोग्य मंत्री रुषीकेश पटेल यांच्या सोबत भाजपचे अनेक नेते दवाखान्यात होते. मोदी यांच्या आई हिराबेन या मोदी यांचे छोटे बंधु पकंज मोदी यांच्या सोबत गांधीनगर येथे रायसन या गावी राहत होत्या.

IPL_Entry_Point

विभाग