मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17 : रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टॅनचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss 17 : रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टॅनचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 14, 2024 05:56 PM IST

MC Stan Video: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस १६चा विजेता एमसी स्टॅनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो शिव्या देताना दिसत आहे.

MC Stan
MC Stan

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस.' बॉलिवूड अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस १६चा एमसी स्टॅन हा विजेता ठरला. सध्या एमसी स्टॅन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन शिव्या देताना दिसत आहे. नेमकं काय झाले? चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन हा गाडीत बसलेला दिसत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती एमसी स्टॅनला शिव्या देताना दिसत आहे. एमसी स्टॅनचा ड्रायव्हर गाडीची काच खाली घेतो. रागात एमसी स्टॅन त्या व्यक्तीचा फोन खेचून घेतो आणि त्याला शिव्या देतो. पण ती व्यक्ती एमसी स्टॅनला शिव्या का देते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही.
वाचा: प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय का ‘मेरी ख्रिसमस’? वाचा रिव्ह्यू...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच एका यूजरने 'आता एमसी स्टॅन याला नक्की मारणार' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'हेटर्स जुने व्हिडीओ शेअर करत आहेत जेणे करून प्रोपेगंडा सेट होईल' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'उगाच जुने व्हिडीओ शेअर करू नका' असे म्हटले. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एमसी स्टॅनची बाजू घेतली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग