मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: सलमानच्या बिग बॉस १६मध्ये सहभागी होणार 'हा' मराठमोळा अभिनेता?

Bigg Boss 16: सलमानच्या बिग बॉस १६मध्ये सहभागी होणार 'हा' मराठमोळा अभिनेता?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2022 10:10 AM IST

आता एक मराठमोळा अभिनेता बिग बॉस १६च्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा अभिनेता कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सलमान खान
सलमान खान (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस १६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता एक मराठमोळा अभिनेता बिग बॉस १६च्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा अभिनेता कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

बिग बॉस १६मध्ये साजिद खान, श्रीजीता दे आणि इतर काही कलाकार सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता बिग बॉस १६च्या घरात मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. निर्मात्यांनी शिवशी संपर्क साधला होता. पण शिवने अद्याप होकार कळवलेला नाही.
वाचा : 'बॉईज ३' ची बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाणे, कमावले इतके रुपये

तसेच 'कुंडली भाग्य' मालिकेत काम करणारा अभिनेता संजय गगनानीला देखील निर्मात्यांनी विचारले असल्याचे म्हटले जात आहे. शोसाठी त्याचे बोलणे सुरु आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिव आणि संजय शोमध्ये सरप्राइज देण्यासाठी पोहोचणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसला होता. शोमधील त्याचे आणि वीणा जगतापचे अफेअर विशेष चर्चेत होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघे एकमेकांना डेट करत होते. पण काही दिवसांनंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

IPL_Entry_Point

विभाग