मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagya Dile Tu Mala: राज कावेरीच्या प्रेमासाठी देणार सत्वपरीक्षा! 'भाग्य दिले तू मला'मध्ये नवे वळण

Bhagya Dile Tu Mala: राज कावेरीच्या प्रेमासाठी देणार सत्वपरीक्षा! 'भाग्य दिले तू मला'मध्ये नवे वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 20, 2022 05:20 PM IST

Bhagya Dile Tu Mala Serial Update: 'भाग्य दिले तू मला'मध्ये राज कावेरीच्या नात्याला मिळणार नवं वळण

भाग्य दिले तू मला
भाग्य दिले तू मला (HT)

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. वैदेहीचा खरा चेहरा कावेरी समोर आला आहे. त्यानंतर तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. कावेरीचे राजवर प्रेम आहे हे वैदेहीला पहिल्यापासून माहिती असते. तरीही ती काही माहिती नाही असे दाखवते. त्यामुळे कावेरी दुखावली गेली. तिने सगळ्यांसमोर वैदेहिचा पर्दाफाश केला आणि राजवर तिचे प्रेम आहे अशी कबुली दिली. पण तात्यांनी मात्र याला नकार दिला आणि ते कावेरीला तिथून घेऊन गुहागरला निघून गेले. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तात्यांनी राजला आता नवे चॅलेंज दिले आहे. त्यांनी राजला गुहागरला राहून पैस कामवून दाखवायचे आहेत. तात्यांचे हे चॅलेंज राजने स्विकारले देखील. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या चॅलेंजमध्ये राज स्वतःला कसं सिध्द करेल ? कसं हे आव्हानं पूर्ण करेल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना दिसणार आहे. शेतकाम तसेच टेम्पो ड्रायव्हरचे काम तो करणार आहे. तात्यांच्या टपरीवर धुणे भांडी करणार आहे. राज म्हणेजच विवेक सांगळेने या सीनसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. अखेर प्रेक्षक जे क्षण बघायला आतुर होते ते मालिकेत बघायला मिळणार आहे. राज कावेरी मध्ये आता प्रेम बहरू लागले आहे. त्यांच्यातील काही रोमँटिक क्षण मालिकेत बघायला मिळणार आहे. तसेच एक सरप्राइज देखील आहे जे लवकरच प्रेक्षकांना कळेल

IPL_Entry_Point

विभाग