मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anurag Kashyap: “सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”, अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान

Anurag Kashyap: “सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली”, अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 10, 2022 09:26 AM IST

Anurag Kashyap: अनुराग कश्यपने नुकताच सुपरहिट ठरलेला चित्रपट 'कांतारा' फेम रिषभ शेट्टीला देखील सल्ला दिला आहे. पण अनुराग सैराट चित्रपटावरुन असे का म्हणाला हे जाणून घ्या...

अनुराग कश्यप
अनुराग कश्यप (HT)

बॉलिवूड चित्रपट निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप हा सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अनुराग सर्वांचे लक्ष वेधून घेतो. आता अनुरागने एका मुलाखतीमध्ये चित्रपट इंडस्ट्रीतील समस्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्याने पॅन-इंडियनच्या हिट्स निर्मिती ट्रेंडवर देखील वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अनुराग कश्यपने ‘Galatta Plus’ द्वारे आयोजित गोलमेजद्वारे सर्वांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपट सैराट आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट 'कांतारा' अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपट हिट होण्याबाबतही विधान केले आहे.

“चित्रपट निर्माते यशातून काय शिकतात हे महत्वाचे आहे. त्यांना त्यांच्या कथा सांगण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे किंवा त्यांना त्यांची पातळी आणखी वाढवण्याची गरज आहे, या दोन गोष्टींपैकी एक शिकतील” असे अनुराग म्हणाला.

पुढे सैराट चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला, 'मी नागराज मंजुळे यांच्याशी बोलत होतो. तेव्हा त्यांना 'सैराट'ने मराठी चित्रपटसृष्टी उद्ध्वस्त केली हे तुम्हाला माहीत आहे का? असे मी म्हटले. पुढे मी म्हणालो कारण त्याच्या यशामुळे चित्रपटात एवढा पैसा कमावण्याची ताकद आहे. याची जाणीव लोकांना झाली. अचानक उमेश कुलकर्णी आणि इतर सर्वांनी आधी ते बनवायचे तसे चित्रपट बनवणे बंद केले, कारण सर्वांना ‘सैराट’सारखेच चित्रपट बनवायचे होते, सर्वजण सैराटचे अनुकरण करू लागले.'

'जर ऋषभ शेट्टीने त्याच्या चित्रपट निर्मितीमध्ये मूलभूतपणे बदल केला आणि बॉक्स ऑफिसवर त्या चित्रपटाला यश मिळणारच असा विचार समोर ठेवून बिग बजेट चित्रपट करण्यास सुरुवात केली तर ही समस्या निर्माण होईल. कारण कोणत्याही चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सारखाच असावा,' असे पुढे अनुराग म्हणाला.

IPL_Entry_Point

विभाग